इटलीत १०० फुटी टॉवरवर घेता येणार डिनर

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी इटली मध्ये १०० फुट उंचीचे इको टॉवर बनविले जात असून लग्झरी डिनर शौकिनांना तेथे लंच, डिनरचा आस्वाद घेता येणार आहे. हिरवळ आणि सरोवराच्या मध्ये हे टॉवर उभे केले जाणार आहेत. टॉवरवर पोहोचण्यासाठी ड्रोन सेवा उपलब्ध केली जात आहे. हॉटेलवरून या ड्रोन मधून थेट टॉवरवर जाणे आणि तेथून परत हॉटेलवर येणे यासाठी ही सेवा असेल. हे टॉवर कसे दिसतील त्याचे फोटो जारी केले गेले आहेत.

पर्यटकांना आकर्षित करणे हाच यामागचा मुख्य हेतू आहे. रोम कंपनी गियानकार्लो जेमा डिझाईन ग्रुप या प्रोजेक्टवर काम करत असून ड्रोन म्हणजे एअर टॅक्सी बनविणाऱ्या हँग होल्डिंग या चीनी कंपनी बरोबर त्यासाठी करार केला गेला आहे. लाकूड आणि स्टीलचा वापर करून टॉवर बनविले जातील. त्यात कॅफे, वेटिंग रूम आणि २०५३ चौरस फुट भागात पॅनोरेमिक रेस्टॉरंट असेल. सेंट्रल लिफ्टने टॉवरच्या छतावर जाता येणार आहे.