‘या’ इलेक्ट्रिक बाईकसाठी प्रति किमी होतात फक्त 20 पैसे खर्च


नवी दिल्ली : भारतीय बाजारात कोरोना साथीच्या महामारीनंतर इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. या क्षेत्रातील बरेच वाहन कंपन्यांनी आपली वाहने भारतीय बाजारपेठेत उतरवण्यास सुरुवात केली आहे. स्वस्त फोन आणि स्वस्त एलईडी टेलिव्हिजननंतर आता डेटेल इंडियाने भारतीय बाजारात इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आणली आहेत. अतिशय आकर्षक आणि भक्कम इलेक्ट्रिक मोटर असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत फक्त 19,999 रुपये (+GST) आहे. कंपनीचा असा दावा आहे की, या इलेक्ट्रिक दुचाकीला प्रवासात प्रति किलोमीटर फक्त 20 पैसे लागतील.

ही इलेक्ट्रिक बाईक कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच b2badda.com वर ग्राहक ऑनलाइन खरेदी करू शकतात. त्यासोबतच बजाज फिनसर्व्हर यांच्याबरोबर कंपनीने भागीदारी देखील केली आहे. ज्यायोगे ग्राहकांची खरेदी आणखी सुलभ होईल, जेणेकरून ग्राहक सहजपणे मासिक हप्त्यांमध्येही या इलेक्ट्रिक मोपेडला वित्तपुरवठा करू शकतील.

जेट ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि मेटलिक रेड कलरसह एकूण तीन रंगांत नवीन Detel Easy इलेक्ट्रिक मोपेड बाजारात उपलब्ध आहे. सामान लोड करण्यासाठी समोर बास्केट आहे. यासह मागील जागेसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याशिवाय त्यामध्ये देण्यात आलेल्या ड्रायव्हिंग सीटची उंचीसुद्धा अॅडजेस्ट केली जाऊ शकते.

डेटेल इझी मध्ये कंपनीने 250 डब्ल्यू क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. यात 48 व्ही क्षमतेची 12 एएच लीफीपीओ 4 बॅटरी वापरली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, ही इलेक्ट्रिक मोपेड सिंगल चार्जसाठी 60 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. या मोपेडची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 7 ते 8 तास लागतात. मोपेडचा वेग ताशी 25 किलोमीटर आहे, म्हणून वाहन चालवण्याचा परवाना आणि नोंदणी देखील आवश्यक नाही.