बाहुबलीची खास सवारी ६ कोटींची

बाहुबली चित्रपटामुळे अफाट लोकप्रियता मिळालेल्या प्रभासच्या कार संग्रहात आता एका नव्या स्टायलिश, लग्झुरीयस कारची भर पडली आहे. प्रभासने ६ कोटींची लोम्बर्गिनी एव्हेंटाडोर एस रोडस्टर कार खरेदी केली आहे. हैद्राबादच्या रस्त्यांवरून ही ऑरेंज कलरची अलिशान कार चालवत असल्याचा प्रभासचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रभासने ही कार वडील सूर्या नारायण राजू यांच्या वाढदिवसानिमित्त घेतली आहे. प्रभास कडे अनेक महागड्या कार्सचा संग्रह आहे. त्याच्या संग्रही दीड कोटी किमतीची जग्वार एक्सजे, ८ कोटींची रोल्स रॉयस फँटम, ५० लाख किमतीची बीएमडब्ल्यु एक्स तीन, ४ कोटींची रेंज रोव्हर, ३० लाखाची स्कोडा अश्या अनेक कार्स आहेत. प्रभास याचे आदिपुरुष, सालार, राधेश्याम असे चित्रपट येत असून आणखी एका नाव न ठरलेल्या चित्रपटात तो भूमिका करणार आहे. या चित्रपटात त्याची हिरोईन आहे दीपिका पदुकोण.