करोना काळात सुद्धा अमेरिकन केएफसीचा भारतीय बाजारात विस्तार
गेले वर्षभर करोनामुळे बहुतेक सर्व क्षेत्रातील उद्योगांवर विपरीत परिणाम झाला असला तरी अमेरिकन फूड चेन कंपनी केएफसी याला अपवाद ठरली आहे. करोना लॉक डाऊन काळातच कंपनीने भारतात नवी ३० रेस्टॉरंट सुरु केली असून पुढच्या काही वर्षात भारतात व्यवसाय वाढीवर खास लक्ष देण्यासाठी काही योजना हाती घेतल्या आहेत.
केएफसी इंडियाचे प्रमुख समीर मेनन या संदर्भात माहिती देताना म्हणाले, या वर्षीही काही नवी आउटलेट आम्ही विविध शहरात सुरु करत आहोत. ग्राहकांपर्यंत आमचा ब्रांड पोहोचावा यासाठी कसून प्रयत्न केले जात आहेत. ब्रांडचा विस्तार आणि प्रसार यासाठी अनेक नव्या योजना हाती घेत आहोत. ऑनलाईन आणि ऑफलाईन ग्राहकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत यामुळेच कोविड काळात सुद्धा आमचा व्यवसाय विस्तार झाला आहे. करोना काळापूर्वी भारतात आमची ४५० रेस्टॉरंट होती, आता हीच संख्या ४८० वर गेली आहे. १३० शहरात केएफसीची रेस्टॉरंट आहेत आणि अन्य शहरात नवी रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत विचार सुरु आहे.