भारतीय लष्कराकडून नेपाळी सेनेला १ लाख कोरोना लस डोस भेट

भारतीय लष्कराने शेजारी नेपाळ देशाच्या लष्कराला १ लाख स्वदेशी कोविड १९ लसीचे डोस भेट म्हणून दिले आहेत. ही लस घेऊन येणारे इंडिअन एअरलाइंसचे विमान रविवारी नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले तेव्हा भारतीय सेना अधिकाऱ्यांनी हे डोस नेपाळी सेनाधिकार्‍यांकडे सोपविले. काठमांडू येथील भारतीय दुतावासातील सूत्रांकडून हे कोविड १९ डोस भेट म्हणून देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी जानेवारी मध्ये भारत सरकारने नेपाळला १० लाख स्वदेशी कोविड १९ लसीचे डोस दिले आहेत. त्यापूर्वी औषधे आणि टेस्टिंग किट सुद्धा भारताने नेपाळला पुरविली होती.