पूर्ण तयारीनिशी भारतात येतेय टेस्ला

एलन मस्क यांच्या टेस्लाने पूर्ण तयारीनिशी भारतीय बाजारात उतरण्याची योजना आखली आहे. खासगी वाहन तसेच सार्वजनिक परिवहन क्षेत्रात क्रांती घडवून आणायची तयारी टेस्लाने केली आहे आणि या वर्षअखेर सात ई कार भारतीय बाजारात उतरविल्या जाणार आहेत असे समजते.एन्ट्री लेव्हल मॉडेलची किंमत ६० लाख आहे. त्याचबरोबर भारतातील स्वस्त कार, बाईक, ऑटो मार्केटवर वरही टेस्लाने लक्ष केंद्रित केले आहे.

सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात शहरांना जोडण्यासाठी हायपरलूप नेटवर्कवर टेस्ला काम करत आहे. त्यादृष्टीने भारतात एकापेक्षा जास्त उत्पादन प्रकल्प टेस्ला सुरु करत आहे. कर्नाटकात पाहिला उत्पादन प्रकल्प वर्षाखेर सुरु होत असून त्यात वर्षाला दीड लाख वाहने उत्पादन होणार आहेत. १० लाख रोजगार निर्माण होणार आहेत.

टेस्लाने भारतासाठी अॅग्रेसीव्ह धोरण स्वीकारले आहे. वर्षाखेर बाजारात येणाऱ्या सात मॉडेल मध्ये ४ प्रीमियम ई कार्स एक्स लाँग रेंज तर तीन मॉडेल स्टँडर्ड रेंज आहेत. मॉडेल तीन ६० लाख, मॉडेल एस दीड कोटी तर एक्स दोन कोटी अश्या या कार्सच्या किमती असतील. कार्स लाँचिंग नंतर बाजारातील हिस्सेदारी दुप्पट किंवा तिप्पट केली जाईल असेही सांगितले जात आहे. देशातील शहरे जोडण्याची सुरवात दिल्ली चंदिगढ हायपरलूप प्रोजेक्टने होणार असल्याचेही सांगितले जात आहे. पॉड टॅक्सी विमानाच्या तिप्पट वेगाने जाऊ शकते आणि तिला २०२५ पर्यंत सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल अशी आशा टेस्लाने व्यक्त केली आहे.