आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करायला हवे याचा विचार करा


आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्याची आस असते. पण, यशस्वी होणे म्हणजे नेमके काय? तर, आपल्या मनातून आपण ठरवलेले ध्येय आपण साध्य करणे म्हणजे यशस्वी होणे. पण, असे अनेक लोकांच्या बाबतीत घडत नाही. ध्येय तर हे लोक ठरवतात. पण, ते पूर्ण मात्र करू शकत नाहीत. यामागे बरे कारण काय असेल…? खरेतर येथेच मेख आहे. आपण यशस्वी का होत नाही यावर विचार करण्यापेक्षा आपण यशस्वी होण्यासाठी काय करायला हवे यावर विचार करायला हवा.

आपल्या जीवनात आलेले अपयश हेच सिद्ध करते की, यशस्वी होण्यासाठी योग्य प्रयत्न आपण केले नाहीत. म्हणूनच यशस्वीतेकडे जीवनाला न्यायचे असेल, तर जगभरातील यशस्वी लोकांचा अभ्यास करा. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. यशस्वी होण्यासाठी त्यांनी काय काम केले किंवा काय मार्ग वापरला याचा बारकाईने अभ्यास करा. जीवनात त्यांना काम करा किंवा न करा पण त्यांचा अभ्यास नक्की करा त्यांचे मार्ग अवलंबण्याचे प्रयत्न करा.

आपल्या शरीराकडून जो व्यक्ती आयुष्यात नेहमीच योग्य कष्टाची अपेक्ष करतो, योग्य कारणासाठी आपली शक्ती खर्च करतो त्या माणसाला यशापासून कोणतीच शक्ती रोखू शकत नाही. पण जो व्यक्ती तशी अपेक्षा आपल्या शरीराकडून न ठेवता कामचुकारपणा, आळस, कंटाळा, पाट्या टाकण्याचे काम करतो, तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही.

एका रात्रीत कोणताही व्यक्ती यशस्वी होत नाही. कष्ट आणि निष्टेचे खत त्यासाठी घालावे लागते. हे सर्व करत असताना माणसाचा आत्मविश्वास कामी येतो. आत्मविश्वास ज्याच्या मनात ठासून भरला आहे. कोणतेही काम त्याला अशक्य नसते. या लोकांची कार्यपद्धती लाथ मारीन तेथे पाणी काढील अशी असते. यश अशा लोकांना लवकर भेटते.

आपल्या ध्येयाकडे न थांबता न थकता जो व्यक्ती चालत राहतो त्याला आपले ध्येय कधीच दूर नसते. काहीही झाले तर हे लोक आपले ध्येय मिळवतातच मिळवातात.

जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी ठेवा. कारणे सांगत बसू नका. तुम्हाला कारणे मागे खेचतील. पण विचार तुम्हाला ध्येयाप्रती पोहोचण्यास मदत करते. अल्पसंतृष्ट राहू नका- अनेक लोकांना अल्पसंतृष्ट राहण्याची भारी हौस असते. जे लोक मिळाले आहे त्यात धन्यता मानतात. पण, एवढ्याने तुमची स्वप्ने साकार होत नाहीत. त्यासाठी सतत आपली महत्वाकांक्षा वाढती ठेवायला हवी.

Leave a Comment