शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना द्यावे लागते ‘या’ 5 गंभीर आजारांना तोंड

work
काही खाजगी कार्यालये आणि कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिफ्टमध्ये ड्युटी करावी लागते. त्यामध्ये पहिली, दुसरी आणि तिसरी पाळी अशी विभागणी असते. दिवसाही वेगवेगळ्या वेळांमध्ये शिफ्ट्स असतात. पण यामुळे तुमच्या झोपण्याची आणि उठण्याची वेळ बदलते. याचा परिणाम शरीरावर होत असतो.

जे लोक रात्री काम करतात. त्यांना वर्क शिफ्ट डिसऑर्डर होतो. मेंदूवर त्याचा परिणाम होतो. सिरकाडियन रिदम आपल्या शरीरात असतो. शरीरातील घड्याळ या रिदममुळे काम करत असते. हे घड्याळ शिफ्ट ड्युटीजमुळे बिघडते आणि शरीरावर परिणाम होतो. अनेक समस्यांना अशा शिफ्ट ड्युटीजमुळे तोंड द्यावे लागते. झोप न येणे, डिप्रेशन, कॉलेस्ट्रॉल वाढणे, त्याचा वाईट परिणाम हृदयावर होणे, वजन वाढणे अशा समस्या डोके वर काढतात. आपल्या शरीरात मोलाटेनिन असते. झोपेचा सिग्नल ते देते. झोपेची समस्या असेल तर मेलाटोनिन सप्लिमेंट घेता येते. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही सप्लिमेंट घेता येते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment