होळीचे रंग हटवण्याचे घरगुती उपाय

holi1
मुंबई : केमिकल्सचे रंग होळीत वापरल्याने त्वचेला मोठे नुकसान होते, हे नुकसान टाळण्यासाठी काही घरगुती आणि नैसर्गिक गोष्टी केल्यातर त्वचा आणि केस यांची हानी होणार नाही.

दही आणि मध – दह्यात थोडे मध मिसळा, याचा हलकासा हात स्किनला लावा, रंग सहज निघण्यास मदत होईल.

दूध आणि खोबरेल तेल – दोन चमचा कच्चे दुध आणि एक चमचा खोबरेल तेल तसेच चिमुटभर हळद एकत्र मिसळा. हे मिश्रण थोडंस चेहऱ्यावर लावा, आणि चेहरा धुवून घ्या, रंग सहज निघून जाईल.

मुल्तानी माती – मुल्तानी माती, ग्लिसरीन आणि लिंबाचा रस मिसळा, ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, नंतर १५ मिनिटांनी धुवा, रंग निघून जाईल.

सफरचंद आणि संत्री – सफरचंद उकळून घ्या, यात थोडासा संत्रीचा रस मिसळा, थंड करा आणि त्वचेवर हे मिश्रण लावून धुतल्यावर रंग लगेच निघेल.

पपईचा गर – सरळ पपईचा गर चेहऱ्याला लावा, रंग निघून जातील, आणि त्वचा निघून जाईल.

अॅप्पल व्हिनेगर – रंगातील केमिकल्समुळे अनेक वेळा खाज सुटते, यासाठी एक कप पाण्यात २ चमचे व्हिनेगर टाका. त्वचेला लावा आराम मिळेल.

खोबरेल तेल – रंग खेळण्यापूर्वी डोक्याला खोबरेल तेल लावा, यामुळे रंग सहज निघतील आणि केसाना इजा होणारा नाही.

Leave a Comment