हा आहे जगातील सर्वात जुना मयखाना

shons
प्राचीन काळापासून मद्यसेवन हा समाजजीवनाचा एक भाग राहिला आहे. आज जगभरात जागोजागी बार, पब दिसतात पण पूर्वीच्या काळी त्यांची संख्या मर्यादित होती. या मयखान्यात येणे फारसे चांगले मानले जात नसे कारण मद्यप्राशन समाजात मान्य नव्हते. अर्थात मद्याचे शौकीन ही बंधने पाळत नसत आणि त्यांची पाउले आपोआप मयखान्याकडे वळत असत.

युरोप मध्ये पब संस्कृती जुनी आहे. युरोपातील सुमारे ११०० वर्षे जुना आणि म्हणूनच जगातील सर्वात जुना मयखाना आयर्लंड मध्ये असून त्याचे नाव आहे शॉन्स बार. आजही हा बार पूर्वीच्याच शान मध्ये सुरु असून इतिहासकार हा बार सर्वात जुना असल्याची खात्री देतात.

seans
विशेष म्हणजे २००४ साली गिनीज बुकने या बारची नोंद सर्वात जुना म्हणून घेतली आहे. आयर्लंडची राजधानी डब्लिन मध्ये हा मयखाना आहे. आजही येथे रात्री उशिरापर्यंत गजबज असते. हा बार आजही पूर्वीच्याच स्वरुपात आहे. त्याचे छत आणि भिंती बांबूच्या असून घोड्याच्या केसांनी त्याची सजावट केली गेली आहे. युरोपात अनेक जुने मयखाने आहेत आणि त्यातील काही ऐतिहासिक आहेत. ब्रिटनचा बिन्गले आर्म्स बार इसवी सन ९५३ मध्ये सुरु झाला आहे. मात्र शॉन्स बार इसवी सन ९०० मध्ये सुरु झाला आहे. याच काळात युरोप मध्ये व्हिस्की आणि ब्लॅक बिअर निर्मिती सुरु झाली होती.

pubs
पब मध्ये लोक मद्याचा आस्वाद घेण्यासाठी येत तसेच संगीत, गप्पा, हसणे खिदळणे यासाठीही येत असत. त्याला शॉन्स बार अपवाद नाही. आजही येथे मोठमोठ्या गादीदार सोफ्यावर बसून लोकांच्या गप्पा रंगतात. याच्या लाकडी खांबावर अनेक आठवणी कोरल्या गेल्या आहेत. त्यात काही कविता आहेत, नकाशे आहेत आणि अनेक शेर आहेत.

आता जगभरातच आरोग्य जागृती होऊ लागली असल्याने अनेक बार बंद होऊ लागले आहेत. आयर्लंड त्याला अपवाद नाही. येथेही अनेक बार बंद झाले आहेत. त्यात देश मंदीच्या फेऱ्यात सापडला आहे, दारूवरील कर वाढले आहेत पण अजून तरी शॉन्स बारवर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसलेला नाही.

Leave a Comment