इंटरव्ह्यूचे अनेक प्रकार

interview
नोकरीसाठीचा इंटरव्ह्यू ही एक वेगळीच परीक्षा असते. आपण ज्यांना ओळखत नाही अशा लोकांशी आपल्याला संवाद साधायचा असतो. हा संवाद सुद्धा साधा नसतो तर तो आपल्या मार्केटिंगसाठीचा असतो. आपल्याला काय माहिती आहे आणि काय माहिती नाही याची परीक्षा असते आणि जे लोक आपला इंटरव्ह्यू घेत असतात तेही आपल्याला फारसे ओळखत नसतात. मात्र आता या गोष्टीत सुद्धा काही बदल होत आहेत. ओळखी नसतानाही समोरासमोर बातचित करून इंटरव्ह्यू होत असत. त्यात आता काही नव्या पद्धतींचा अंतर्भाव झाला आहे. फोन इंटरव्ह्यू आणि डिनर इंटरव्ह्यू असे दोन नवे प्रकार उदयाला आले आहेत. या नव्या इंटरव्ह्यूमध्ये केवळ एकाच व्यक्तीचा नव्हे तर गटाचा सुद्धा इंटरव्ह्यू एकदम घेतला जातो. त्यातून केवळ ज्ञान आणि कौशल्यच नव्हे तर आपले वागणे आणि मॅनर्स यांचीही परीक्षा घेतली जात असते.

एखाद्या उमेदवाराला त्याच्या क्षेत्रातले ज्ञान उदंड असेल, परंतु त्याच्या वागण्या-बोलण्यामध्ये जर शिष्टाचाराचा अभाव असेल तर तो कंपनीसाठी फारसा उपयुक्त ठरत नाही. कंपनी या शिष्टाचाराला सुद्धा खूप महत्व देत असते. त्यामुळे आपल्यावर कधीही डायनिंग इंटरव्ह्यूची वेळ येऊ शकेल याचा विचार करून आपण आपल्या टेबल मॅनर्स सुद्धा सुधारल्या पाहिजेत. डायनिंग इंटरव्ह्यूमध्ये एकाच वेळी अनेक उमेदवारांना संमिलित केलेले असते. त्यामुळे उमेदवारावरच्या मनावरचा ताण थोडा कमी झालेला असतो. फोन इंटरव्ह्यू हा एक नवा प्रकार पुढे आला आहे. या इंटरव्ह्यूमागे उमेदवाराचा आणि कंपनीचा वेळ वाचवणे हा हेतू असतो. त्यामध्ये मुलाखत घेणारा आणि देणारा समोरासमोर नसतात. मात्र नेमके प्रश्‍न विचारले जात असतात, कारण फोनवरून फार अघळपघळ बोलता येत नसते.

त्याच बरोबर ज्या गोष्टी विचारण्यासाठी समोरासमोर येण्याची गरज नाही अशा गोष्टी फोनवरून विचारल्या जात असतात. उदा. वय, आधीचा अनुभव, पगाराची अपेक्षा, बॉण्ड द्यायला तयार आहे की नाही अशा औपचारिक प्रश्‍नांची उत्तरे फोनवरून विचारली जात असतात. तेव्हा फोन इंटरव्ह्यूचे एक वेगळेच तंत्र निर्माण होते. त्याचे हे तंत्र काय असेल याचा विचार करून आपणच फोनवरून इंटरव्ह्यू देण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्याचबरोबर फोनवरून बोलताना काही तांत्रिक अडचणी आल्या तर संवाद अर्धवट राहण्याची शक्यता असते. अशा वेळी आपले बोलणे पुरेसे स्पष्ट असले पाहिजे.

Leave a Comment