ह्या समस्यांवर उपयुक्त आहे चहा


थकवा शारीरिक असो, किंवा मानसिक असो, एक कप गरमागरम चहा चैतन्य, उत्साह देणारा ठरतो. चहाचे सेवन करण्याचे अनेक फायदे आपल्याला अवगत आहेतच, पण आपल्या रोजच्या चहामध्ये आले, तुळस, इत्यादी अर्क घालुन हा नेहमीचा चहा आणखीनच आरोग्यदायी ठरला आहे. तसेच तब्येतीच्या लहान सहान तक्रारींमध्ये देखील चहाचे सेवन उपयुक्त ठरत आहे.

क्वचित कधीतरी बाहेर हॉटेल मध्ये खाणे झाल्याने किंवा कुठल्या समारंभाच्या प्रसंगी पक्वान्नांचे जेवण झाल्याने पोट गच्च होते. शरीर देखील जड वाटू लागते, सुस्ती येते. अश्यावेळी जॅस्मिन, कॅमोमाईल, पेपरमिंट इत्यादी फ्लेवर्स च्या चहाचे सेवन उपयुक्त ठरते. जर ह्या फ्लेवर्स चे चहा उपलब्ध नसतील, तर पण्यामध्ये रोजच्या वापरातील चहा घालून त्यासोबत थोडे मेथीदाणे घालुन चहा उकळून प्यावा. ह्या चहामुळे स्नायूंवर आलेला ताण दूर होण्यास मदत होऊन, पचनतंत्र सुधारते.

जर शरीरामध्ये कोणत्याही कारणाने वेदना होत असतील तर ग्रीन टीचे सेवन उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे रेडबुश, रोईबस हे चहाचे प्रकार देखील उपयुक्त ठरतात. जर त्वचा रुक्ष, तेजहीन झाली असेल, तर कॅलेन्ड्युला, कॅमोमाईल, ग्रीन टी, लीकरीश ( ज्येष्ठमध ) ह्या प्रकारचे चहा उपयोगी ठरतात. ह्या चहाच्या प्रकारांच्या सेवनाने शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकली जाऊन त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. जर कधी मळमळ होत असेल, तर पाण्यामध्ये नेहमीच्या चहा सोबत आले, किंवा पेपरमिंटचा वापर करता येईल. इतर फ्लेवर्स प्रमाणे आल्याच्या फ्लेवरच्या टी बॅग्स देखील बाजामध्ये उपलब्ध आहेत.

जर मानसिक तणाव जाणवत असलेल, काही केल्याने मन आणि चित्त स्थिर राहत नसेल, तर कॅमोमाईल, पॅशन फ्रुट, लेमनग्रास ह्या फ्लेवर्स च्या चहाचे सेवन करावे. हे प्रकार मनाला उत्साह देणारे आणि शरीराचा थकवा कमी करणारे आहेत. सर्दी पडसे, घसा खराब झाल्यास आल्याचा चहा, किंवा थाईम फेल्वरच्या चहाचा आस्वाद घ्यावा. तसेच जिंसेंग असणारा चहा, एकाग्रता वाढविणारा, बुद्धीवर्धक, आणि शारीरिक थकवा दूर करणारा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment