हे अन्नपदार्थ किती काळ राहू शकतात ताजे?


आपण खात असलेले सर्व अन्नपदार्थ हे काही ठराविक काळाकरिता ताजे राहू शकतात. त्यापलीकडे जाऊन ते पदार्थ खाण्यास योग्य राहत नाहीत.जे खाद्यपदार्थ पॅकेज्ड असतात, त्यांच्यावर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. ती पाहून तो खाद्यपदार्थ किती काळापर्यंत आपल्याला वापरता येऊ शकेल याची माहिती आपल्याला मिळते. मात्र काही अन्नपदार्थ, उदाहरणार्थ फळे, भाज्या, धान्य इत्यादी गोष्टी किती काळ वापरण्याजोग्या राहू शकतात, हे देखील माहित असणे अगत्याचे आहे.

पुष्कळदा आपण मांसाहारी पदार्थ फ्रीझर मध्ये साठवून ठेवत असतो. फ्रीझरमधील मांसाहारी पदार्थ पुष्कळ काळ टिकून ही राहतात. पण जर त्या पदार्थाचा रंग बदललेला दिसला, तर मात्र तो पदार्थ खाण्याजोगा उरलेला नाही हे लक्षात घ्यावे. तसेच त्या मांसाहारी पदार्थावर जर चिकटा आला असेल, म्हणजेच पदार्थ चिकट वातातासेल, तरतो पदार्थ खाण्यायोग्य नाही असे समजावे. तसेच पालेभाज्या देखील फार काळ टिकून रहात नाहीत. जास्त काळ ठेवलेल्या पालेभाज्यांची पाने पिवळी पडू लागतात, आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या पालेभाज्या सुकून जातात. त्यामुळे पालेभाज्या साठवताना कागदामध्ये गुंडाळून ठेवाव्यात, व पुढील दोन तीन दिवसांमध्ये वापरून संपवाव्यात.

पुष्कळ लोक सकाळच्या नाश्त्यासाठी कॉर्न फेल्क्स, म्युसली असे पदार्थ खातात. या पदार्थांना फ्रीजमध्ये साठविण्याची गरज नसते. बाहेरच हे पदार्थ काही महिने चांगले राहू शकतात. हेपदार्थ साठविताना घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये साठवावेत. साधारण सहा ते आठ महिने हे पदार्थ व्यवस्थित टिकतात. नाश्त्यासाठी ज्या लोकांना अंडे खाण्याची सवय आहे, त्यांनी ताजी अंडी खाण्याबाबत जागरूक असावे. अंडी ताजी आहेत किंवा नाही हे समजण्यासाठी एक अतिशय सोपा उपाय करून बघता येईल. एकामोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यावे. त्यामध्ये अंडी अलगद सोडवीत. जी अंडी ताजी असतील, ती भांड्याच्या तळाशी बुडतील, तर जी अंडी शिळी असतील, ती पाण्यावरच तरंगतील. शिळी अंडी खाणे टाळावे.

दुध आणि दुग्धजन्य पदार्थ फ्रीझर मध्ये गोठवून ठेवल्यास दोन ते तीन आठवड्यांपर्यंत खाण्याजोगे राहतात. मात्र जर हे पदार्थ फ्रीजमध्ये न गोठलेल्या अवस्थेत असतील, तरते दोन ते तीन दिवसांमध्ये वापरून संपवावेत. त्यापेक्षा जास्त काळ ठेवलेले दुध नासण्याची शक्यता असते. ताकावरीलकाढलेलेताजे लोणी फ्रीज मध्ये ठेवताना, ज्या भांड्यामध्ये लोणी काढले आहे, त्यामध्ये थोडे पाणी भरून ठेवावे. हे पाणी दर तीन चार दिवसांनी बदलून टाकावे.असे केल्याने लोणी फ्रीज मध्ये तीन आठवड्यांपर्यंत चांगले राहते.

आपण जर घरामध्ये धान्य साठवत असाल, तरते जास्त काळ टिकून राहावे या करिता काही उपायांचा अवलंब करावा. तांदूळा मध्ये कीड लागू नये त्यासाठी त्यामध्ये बोरिक पावडर मिसळून ठेवावी. तसेच गहू साठवतानात्याला एरंडेल लावून ठेवावे. त्यानेगव्हाला कीड लागत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment