फॅशन हॉरोस्कोप – महिलांनी राशीप्रमाणे करावा पोशाख


एखादा विशिष्ट पद्धतीचा पोशाख तुम्हाला का खुलून दिसतो ह्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? किंवा फ्लोरल प्रिंट पेक्षा तुम्हाला स्ट्राईप्स का आवडतात? किंवा काही रंगांच्या मानाने तुम्हाला विशिष्ट रंग अधिक का आवडतात? कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, पण तुमच्या पोषाखाच्या आवडी निवडींवर तुमच्या राशीचा काही अंशी प्रभाव असतो. ह्यामध्ये तथ्य कितपत आहे हे नेमके सांगता येणे कठीण असले, तरी ही कल्पना मोठी रोचक आहे यात वाद नाही. त्यामुळे राशींच्या अनुरूप कश्या प्रकारचे पोशाख महिलांनी निवडावेत, हे पाहणे रोचक ठरेल.

मेष राशीच्या महिला नवीन ट्रेंड्स कायम करणाऱ्या असतात. अनेक वस्तू एकत्र करून ह्या स्वतःची खास स्टाईल निर्माण करण्यात पटाईत असतात. बोल्ड रंग आणि स्ट्रक्चर्ड लुक्स यांना आवडतात. मग साडी असो, किंवा एखादा पाश्चात्य पोशाख असो, त्यांचे पोशाख नेहमीच उठून दिसणारे असतात. वृषभ राशीच्या महिलांना फेमिनीन रंग किंवा पेस्टल रंग जास्त पसंत पडतात. त्यांच्या प्रत्येक पोषाखामध्ये सुंदर रंगसंगती आणि कलाकुसर दिसून येते. जाडसर कपड्यापेक्षा ह्या महिला मुलायम कपडा वापरणे अधिक पसंत करतात. मिथुन राशीच्या महिला मनमोकळ्या स्वभावाच्या असून, पोषाखांच्या बाबतीत ही नेहमी काही तरी वेगळे प्रयोग करू पाहणाऱ्या असतात. चित्रविचित्र प्रिंट, मोकळे ढाकळे पोशाख यांना आवडतात. ह्यांचा फॅशन सेंन्स अतिशय उत्तम असतो.

कर्क राशीच्या महिलांना मुलायम कपडा, ए लाईन ड्रेसेस, पेन्सिल स्कर्ट असे पोशाख घालणे जास्त आवडते. तर सिंह राशीच्या महिला आपला पोशाख अतिशय काळजीपूर्वक निवडतात. कन्या राशीच्या महिलांचे त्यांच्या पोशाखामधील प्रत्येक बारकाव्याकडे लक्ष असते. त्यांना भडक रंग आवडत नाहीत. तसेच कस्टम मेड कपड्यांवर यांचा जास्त भर असतो. तूळ राशीच्या महिला रंगेबिरंगी पोशाख आणि मोठ्या प्रिंटच्या कपड्यांपासून चार हात लांब राहणे पसंत करतात. ह्यांना फेमिनीन, हलके रंग जास्त आवडतात. तसेच मुलायम कपड्यावर हयांचा भर असतो.

वृश्चिक राशीच्या महिलांना परफेक्ट फिटिंगचे कपडे जास्त आवडतात. लाल, नीळा हे त्यांचे आवडते रंग आहेत. तसेच ह्यांना गडद रंग जास्त आवडतात. धनु राशीच्या महिलांना आरामदायक कपडे आवडतात. त्यांच्या कपाटांमध्ये नेहमी ढिले ढगळ, हवेशीर कपडे जास्त दिसून येतात. स्टाईल पेक्षा अधिक कम्फर्टला महत्व देणाऱ्या ह्या महिला आहेत. मकर राशीच्या महिला काल्सिक ड्रेसिंगसाठी ओळखल्या जातात. स्कर्ट किंवा ड्रेस पेक्षा ट्राऊझर घालणे ह्या महिलांना जास्त आवडते. पोषाखाच्या बाबतीत ह्या महिला इतरांच्या मताची अजिबात पर्वा न करता, त्यांना आवडेल तसेच पोशाख परिधान करतात. कुंभ राशीच्या महिलांची फॅशन बदलत्या काळानुसार बदलत असते. ह्या महिलांनाही हटके पोशाख करणे आवडते. मीन राशीच्या महिला सिल्क, शिफॉन, वेल्व्हेट अश्या मुलायम कपड्यांनी बनलेले पोशाख घालणे पसंत करतात. ह्यांना नेहमी मन प्रसन्न करणारे रंग आवडतात.

Leave a Comment