खाण्याविषयी काही…


आधीच आपण जाड होत आहोत आणि त्यामुळे काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत बरेच चोखंदळ व्हायला लागलो आहोत. वाढत्या जाडीसोबतच आपल्याला वाढत्या राहणीमानातले काही विकारही जडले आहेत आणि सोशल मीडियामुळे आपल्यापर्यंत आपल्या आरोग्याविषयीची अनमोल माहिती आपल्यावर येऊन आदळत आहे. ती माहिती कोणीही देतो. काही लोक गोमूत्रामुळे कर्करोगही बरा होतो असा दावा करतात पण हे निमहकीम आपली प्रकृती सुधारण्याचा नाही तर बिघडण्याचा वसा घेतला असल्यागत उलट सुलट माहिती आपल्यावर आदळवत असतात. जे डॉक्टर नाहीत तेही अशा माहितीचा रतीब घालत असतात. त्यामुळे त्यांचा सल्ला ऐकून त्यांनी सुचविलेले औषध घेतले तर आपले आरोग्य उलट बिघडण्याची शक्यता आहे.

आपण काही गोष्टी मनात पक्क्या करून बसलेलो असतो. कोणाला मधुमेह झाला की बटाटे वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जातो. एखाद्या महिलेला लग्न मानवले आणि विवाहानंतर एक दोन वर्षात जरा थुलथुलीतपणा येण्याची चिन्हे दिसायला लागली की हितसंबंधी लोक तिला सावध करतात. बटाटा जरा जपूनच खा असे सांगितले जाते. अशा लोकांनी बटाट्याला आपला शत्रू करून टाकले आहे पण प्रत्यक्षात बटाटा एवढा काही खलनायन नाही. मुंबईच्या आहारतज्ज प्रिया पालन यांनी बटाट्याला एवढे घाबरण्याचे काम नाही असे बजावले आहे. बटाट्यात अनेक प्रकारचे फायटो न्यूट्रीएन्टस् असतात त्यामुळे बटाटा काही लोकांना मानवत नसला तरी तो अनेकांसाठी गरजेचा असतो. बटाट्यात उष्मांकही कमी असतात.

वर्षानुवर्षे आपण असा समज करून घेतला आहे की मीठ आपल्या खाण्यात कितीही आवश्यक असले तरीही ते रक्तदाबाला घातक असते. म्हणून डॉक्टर आपल्याला मीठ कमी खाण्याचा सल्ला देत असतात. आपण त्यामुळे असे समजून चालतो की जितके मीठ कमी खाल्ले जाईल तितका रक्तदाब आटोक्यात येईल पण हा गैरसमज आहे. पण डॉ. नुपूर कृष्णन यांच्या मते आपल्या शहरातला ओलावा टिकून राहण्यासाठी शरीराला मीठ आवश्यकच असते. तो आपला आणि रक्तदाबाची तक्रार असणारांचा शत्रू नाही. वजन वाढले असेल तर अंडी खाऊ नयेत असे म्हटले जात असल्याने आपण अंड्यांवरही फुली मारलेली असते. पण प्रत्यक्षात ती फार पौष्टिक असतात. ज्याला वजन उतरण्याचा विकार जडला असेल त्याला ते वाढवण्यासाठी अंडी आवश्यक आहेत. अड्यांना मेंदूही तल्लख राहतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment