या गावात फक्त महिलाच खेळतात होळी

holi1
मिरपूर – होळीचा सण देशभरातील सर्वच स्त्री-पुरुष उत्साहात साजरा करतात. मात्र याला उत्तर प्रदेशमधील मीरपूर जिल्ह्यातील कुंडरा गाव अपवाद आहे. येथे गेल्या अनेक वर्षांपासून फक्त महिलाच होळी खेळतात. विशेष म्हणजे जेव्हा महिला होळी खेळतात तेव्हा येथील पुरुष नेहमीप्रमाणे काम करतात.

गावातील रामसीतेच्या मंदिरात सर्व महिला एकत्र येऊन होळी खेळतात. तीस वर्षांपूर्वीपर्यंत गावातील महिला आणि पुरुष एकत्रपणे रामसीतेच्या मंदिरात होळी साजरी करत होते. एकदा एका दरोडेखोराने गावातीलच एका व्यक्तीला पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून गोळी मारून ठार केले. तेव्हापासून पुढे काही वर्षे गावात होळी साजरी केली जात नव्हती. मात्र गावातील महिला यावर गप्प राहिल्या नाहीत. त्यांनी पुरुषांना समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी नकार दिला. यानंतर महिलांनी एकत्र येऊन पुन्हा हा उत्सव सुरू केला. यामुळे गावातील फक्त महिलाच एकत्र येऊन रामसीतेच्या मंदिरात होळी उत्साहात साजरी करतात.

Leave a Comment