एलिझाबेथ राणीच्या पतवंडाचा बाथरूम मध्ये झाला जन्म

ब्रिटनची महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय हिची नात झारा टींडल हिने तिच्या तिसऱ्या अपत्याला जन्म दिला आहे. झाराला प्रसुती वेदना होऊ लागल्यावर हॉस्पिटल मध्ये नेण्याइतका अवधीच मिळाला नाही त्यामुळे घरातच बाथरूम मध्ये ब्रिटीश राजघराण्याचा हा वारस जन्माला आला असे समजते. नवजात बालकाचे नाव लुकास फिलीप टींडल असे ठेवले गेले आहे.

झारा टींडल ही राणीची मुलगी प्रिन्सेस अॅन आणि इंग्लंडचा माजी रग्बी खेळाडू माईक टींडल यांची मुलगी आहे. बकिंघम पॅलेस कडून देण्यात आलेल्या बातमीत राणी एलिझाबेथ आणि ड्युक पतवंडाच्या जन्माने आनंदी झाले असून बाळाला पाहण्यास उत्सुक आहेत. राणीचे हे १० वे पतवंड आहे.

झारा यांचे हे तिसरे अपत्य आहे. लुकास ब्रिटन राजघराण्याचा २२ नंबरचा वारस बनला आहे.