विदर्भात एका दिवसात कोरोनामुळे ७४ जणांनी गमावला आपला जीव


नागपुर – मागील २४ तासांमध्ये विदर्भातील अकरा जिल्ह्यात कोरोनामुळे तब्बल ७४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूंपैकी ६३.५१ टक्के मृत्यू हे केवळ नागपूर जिल्ह्यातील आहेत. गुरूवारी विदर्भात २४ तासांत ६ हजार ७६२ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

कोरोनामुळे नागपूर जिल्ह्यात दिवसभरात ४७ रुग्णांचा मृत्यू नोंदवले गेले आहेत. त्यात शहरातील ३३, ग्रामीण १०, जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात दिवसभरात ३ हजार ५७९ नवीन रुग्ण आढळले आहेत. अमरावती जिल्ह्यात २४ तासांत ६ मृत्यू तर ३४२ नवीन रुग्ण आढळले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ५ रुग्णांचा मृत्यू तर ४३९ नवीन रुग्ण आढळले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात २ मृत्यू तर २४५ नवीन रुग्ण आढळले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात मृत्यू नसला तरी ५६ रुग्ण आढळले. वर्धा जिल्ह्यात ४ मृत्यू तर २५१ नवीन रुग्ण आढळले. भंडाऱ्यात मृत्यू नसला तरी २४४ रुग्ण आढळले. गोंदियात मृत्यू नसला तरी ८८ रुग्ण आढळले.

२२ मार्चला नागपूर जिल्ह्यात ४० रुग्णांचा मृत्यू तर २४ मार्चलाही ४० रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आला होता. परंतु २५ मार्चला मृत्यूंची संख्या ४७ नोंदवण्यात आल्याने हा नववर्षातील कोरोना बळींचा उच्चांक ठरला आहे. वाशिमला ४ मृत्यू झाले व ३०६ रुग्ण आढळले. अकोल्यात १ मृत्यू झाला, ४३९ नवीन रुग्ण आढळले. बुलढाणा जिल्ह्यात ५ मृत्यू झाले असून ७७३ रुग्णांची नोंद झाली.