दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा भारतावर विजय


पुणे : भारताचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने 6 गडी राखत पराभव केला. आजच्या सामन्यात इंग्लडने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंडसमोर भारतीय संघाने 337 धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडच्या फलंदाजांनी या आव्हानाला धडाकेबाज फलंदाजी करत सहज पूर्ण केल्यामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेयरस्टो याने 112 चेंडूत 124 धावा केल्या. तर बेनस्टोक्सने 52 चेंडूत 99 धावा केल्या.

इंग्लंडने भारताने दिलेल्या 337 धावांच्या आव्हानाला पाठलाग करताना धमाकेदार सुरुवात केली. होती. तत्पूर्वी रिषभ पंतने अवघ्या 40 चेंडूत 77 धावा ठोकून वादळ उभे केले. त्याला हार्दिक पांड्याने 16 चेंडूत 35 धावा करुन झंझावाती साथ दिली. पंतने 7 तर पंड्याने 4 षटकार ठोकून गहुंजे मैदान दणाणून सोडले. दोघांनी मिळून 11 षटकार ठोकले. कृणाल पंड्या 12 धावांवर नाबाद राहिला.