प्रियंका शर्मा- पहिली महिला एनकाउंटर सबइन्स्पेक्टर

दिल्लीत गुरुवारी झालेल्या एका एनकाउंटर मध्ये सबइन्स्पेक्टर प्रियंका शर्मा यांनी पहिली महिला एनकाउंटर सबइन्स्पेक्टर बनण्याची कामगिरी केली आहे. गुंडाबरोबर झालेल्या धुमश्चक्रीत त्यांनी गोळ्या झेलल्या आणि बदमाशांना पकडण्याचा पराक्रमही केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका मूळच्या रोहतक येथील असून दिल्ली पोलिसात कार्यरत आहेत. दिल्ली पोलिसांना दोन इनामी बदमाश प्रगती मैदानाजवळ येणार असल्याची खबर मिळाली होती. या दोघांवर ४ आणि दोन लाखांचे इनाम आहे. पोलिसांनी या भागात सापळा लावून बॅरीकेड लावले होते. मात्र खबरी प्रमाणे निळ्या रंगाच्या कार मधून आलेल्या या बदमाशनी बॅरीकेड तोडून जाण्याचा प्रयत्न केला आणि गोळीबार सुद्धा केला. यात एसीपी पंकज आणि सबइन्स्पेक्टर प्रियंका याना गोळ्या लागल्या पण बुलेट प्रूफ जॅकेट असल्याने त्यांना दुखापत झाली नाही.

दरम्यान पोलीसानी प्रत्युतरादाखल केलेल्या गोळीबारात हे दोघे बदमाश पोलिसांच्या हाती लागले असल्याचे समजते.