अनुष्काच्या सुंदर हास्याचे रहस्य गंडूष, म्हणजे ऑईल पुलिंग

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सौंदर्याची मान्य मानके लावली तर सुंदर आहे असे म्हणता येणार नाही. मात्र ब्युटी वुईथ ब्रेन या कॅटेगरीत असलेल्या या अभिनेत्रीला सुंदर हास्याचे वरदान आहे. अर्थात या मागे शेकडो वर्षे जुन्या आयुर्वेदिक पद्धतीचा अनुष्का दररोज करत असलेला वापर कारणीभूत आहे. ही आयुर्वेदिक पद्धत म्हणजे गंडूष. यालाच आजच्या आधुनिक काळात ऑईल पुलिंग असे म्हणतात. आजकाल ऑईल पुलिंगचे फायदे, त्याचे उपयोग आणि ते कसे करायचे यावर बरीच चर्चा सुरु आहे.

गंडूष म्हणजे सकाळी उठल्यावर अनोश्या पोटी तोंडात तेल भरून घ्यायचे आणि ३ ते ४ मिनिटे ते तोंडात खुळखूळवयाचे आणि नंतर थुंकून द्यायचे. एका अर्थी याला तेलाची गुळणी करायची असेही म्हणता येईल. याचे फायदे अनेक आहेत.

गंडूष मुळे दात चमकदार होतातच पण शरीरातील सर्व विष द्रव्ये बाहेर टाकली जाऊन शरीर डीटॉक्स होते. घसा, कान, नाकात कोणतेही संसर्ग होत नाहीत. त्वचा तजेलदार होते, श्वास दुर्गंधी येत नाही. तोंड पूर्ण स्वच्छ होते. दातदुखीचा त्रास होत नाही. गंडूष कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकते. त्यासाठी तीळ अथवा खोबरेल तेलाचा वापर करता येतो.

या प्रक्रियेमुळे पचनसंस्था सुधारते. आतडी साफ राहतात. शरीराचे कार्य सुधारते. खाल्लेल्या अन्नाचा पूर्ण लाभ शरीराला मिळतो. रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि त्वचेच्या पेशींचे चांगले पोषण होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही