जगातील सर्वात जास्त लस बनवणाऱ्या सीरम इंस्टिट्यूट कंपनीचे सीईओ अदर पुनावाला यांच्या राहणीमाना बाबत अनेक गोष्टी प्रसिद्ध झाल्या आहेत. पण सीरम इंन्स्टिट्यूटला कोरोना काळात वारेमाफ नफा झाल्यामुळे अदर पुनावाला यांनी आता लंडनमध्ये एक राजवाडा भाड्यानं घेतला आहे. पण त्यासाठी किती भाडे मोजावे लागणार आहे. याचा आकडा सांगितल्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.
लंडनमध्ये अदर पुनावालांनी एवढे भाडे देऊन घेतला राजवाडा
कोरोनामुळे जगभरात प्रसिद्ध झालेली सीरम इंन्स्टिट्यूटला कोरोना काळात जबरदस्त नफा झाला आहे. त्यामुळे आपल्या रॉयल लाईफस्टाईलमुळे आधीच प्रसिद्ध असलेले सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्या लंडनमधील राजवाड्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
लंडनमध्ये हा राजवाडा अदर य़ांनी राहण्यासाठी भाड्याने घेतला आहे. पुनावाला यांच्या नव्या राजवाड्याचे भाडे दर आठवड्याला 50 हजार पाऊंड एवढे आहे. आजच्या भारतीय दराने मोजायचे म्हटलं तर. पुनावाला यांच्या राजवाड्याचे भाडे दर आठवड्याला 50 लाख रुपये म्हणजे महिन्याला 2 कोटी रुपये एवढे आहे.
लंडन शहरापासून काही अंतरावर असणारा पुनावालांचा हा राजवाडा 25 हजार स्क्वेअर फुटाचा असून पोलंडमधील अतिश्रीमंतांपैकी एक डॉमनिका कुलझुक त्याच्या मालकीण आहेत. दरम्यान पुनावाला आणि कुलझुक या दोघांच्याही कंपन्यांनी अधिकृतपणे या ‘भाडे’ कराराविषयी बोलण्यास नकार दिला आहे.