एलआयसीचे गृहकर्ज घेणाऱ्या कर्जदारांचे थेट 6 EMI होणार माफ, पण…


नवी दिल्लीः गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी जीवन विमा कॉर्पोरेशनच्या गृह वित्त युनिट एलआयसी हाऊसिंग फायनान्सने योजनेंतर्गत मोठी घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत कर्ज घेणाऱ्यांसाठी कंपनीने 6 EMI माफ करण्याची घोषणा केली आहे. हा लाभ गृह वरिष्ठ योजनेत DBPS अंतर्गत येत असलेल्या लाभार्थी आणि निवृत्तीवेतनधारकांना मिळणार आहे.

37 वा, 38 वा, 73 वा, 74 वा, 121 वा आणि 122 वा EMI एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या घोषणेनुसार द्यावा लागणार नाही. जेव्हा ते ईएमआय ड्यू डेट असेल तेव्हा मूळ रकमेमधून समायोजित केले जातील. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन सध्या 6.9 टक्के दराने 15 कोटींपर्यंत गृह कर्ज प्रदान करीत आहे. यासाठी ग्राहकांचा CIBIL स्कोअर 700 पेक्षा जास्त असावा लागतो.

गृह वरिष्ठ ही एक अनन्य साधारण गृहकर्ज उत्पादन योजना आहे, ज्यात कर्जदाराचे वय 65 वर्षांपर्यंत असावे लागते. तो त्याच्या नावावर 80 वर्षांसाठी म्हणजे 15 वर्षांसाठी कर्ज घेऊ शकतो. कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त 30 वर्षांचा असू शकतो. सेवानिवृत्त किंवा सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होऊ शकेल. या व्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, रेल्वे, संरक्षण आणि बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांनाही या योजनेचा लाभ मिळतो.

ही योजना जुलै 2020 मध्ये सुरू केली गेली. एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत भगवान म्हणाले की, ही योजना सुरु केल्यापासून त्याला चांगली मागणी आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत 3000 कोटींची 15 हजार गृह कर्जे वाटण्यात आली आहेत.