फेसबुक आणणार स्मार्टवॉच

सध्या स्मार्टवॉचचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांची स्मार्टवॉच बाजारात आणली आहेत पण सध्या तरी जगात सर्वधिक मागणी असलेले स्मार्टवॉच म्हणून अॅपल स्मार्टवॉचचीच ओळख आहे. अॅपल ला तगडी स्पर्धा करण्यासाठी सोशल मिडिया साईट फेसबुकने कंबर कसली असून फेसबुकचे अत्याधुनिक तंत्राने बनविलेले स्मार्टवॉच लवकरच बाजारात दाखल होणार आहे.

फेसबुकच्या हायटेक स्मार्टवॉच मध्ये ऑगमेंटेड रियालिटी एआर स्मार्ट ग्लास दिली जाईल असे समजते. हे वॉच अँड्राईड आधारित असेल आणि त्याला गुगल ओएस दिली जाईल. फेसबुक स्वतःची ओएस सुद्धा या वॉच साठी तयार करू शकते असेही संकेत दिले गेले आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वीच फेसबुकने स्मार्टवॉच सारखी गॅजेट बनविता यावीत यासाठी सीटीआरएल लॅब्ज चे अधिग्रहण केले होते.