फायझरने करोनासाठी ओरल टॅब्लेट चाचण्या सुरु केल्या

जगभरात कोविड १९ लसीकरण मोहीम वेगाने राबविली जात आहे, अनेक वैद्यानिक लस तयार करण्यावर संशोधनात मग्न आहेत अश्यावेळी अमेरिकन औषध कंपनी फायझरने तोंडाने घेता येणारी, करोनावरील औषधी गोळी तयार केली आहे. या ओरल पिलच्या क्लिनिकल चाचण्या सुरु झाल्या असून त्याचे परिणाम समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे.

करोना लसीबाबत अनेक लोकांच्या मनात संभ्रम आहे. अश्या वेळी तोंडाने घेता येणारी गोळी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. जागतिक संशोधन प्रमुख वैज्ञानिक व अध्यक्ष मिकाइल डॉल्सटन म्हणाले ओरल थेरपी स्वरुपात ही गोळी घेता येणार आहे. कोविड १९ साठी तयार केलेल्या या नॉवल ओरल अँटीव्हायरल ड्रगच्या क्लिनिकल ट्रायल सुरु आहेत. ही गोळी सार्स सीओव्ही-२-३ सीएल प्रमाणे आहे. या ड्रगने कोव्ह २ विरुध्द विट्रो अँटीव्हायरल कार्यात व करोनाशी लढण्यात चांगली कामगिरी बजावली आहे.

या गोळीचा वापर कोविड १९ उपचार आणि भविष्यात करोनापासून होणारा धोका टाळण्यासाठी करता येणार आहे. पीएफ- ०७३२१३३२ असे या गोळीचे कोड नेम असून करोनाचा संसर्ग झाल्यावर सुद्धा या गोळीचा वापर करता येणार आहे. त्यामुळे लसीकरणाबरोबरच आणखी एक औषध उपलब्ध होणार आहे.