पुणे – जनरलिस्ट ऑफिसर या पदाच्या १५० जागांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती प्रक्रिया राबवली जात असून ६ एप्रिल २०२१ पर्यंत या पदासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. २२ मार्च २०२१ पासून या पदाची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ६ एप्रिल २०२१ रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या पदासाठी २५ ते ३५ वर्षे वयोगटातील उमेदवाराच अर्ज करु शकतात
१५० जागांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरभरती
बँक ऑफ महाराष्ट्रकडे जनरलस्टिस्ट ऑफिसर पदासाठी एकूण १५० रिक्त पदांपैकी अनारक्षित प्रवर्गासाठी ६२ जागा, ओबीसीसाठी ४० जागा, एससीसाठी २२ जागा, ईडब्ल्यूएससाठी १५ जागा आणि एसटी प्रवर्गासाठी ११ जागा आरक्षित आहेत. परंतु उमेदवारासमोर यासाठी शिक्षणाच्या अटी देखील ठरवून दिल्या आहे. उमेदवाराने या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून कोणत्याही विषयात किमान ६०% गुणांसह पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे किंवा मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठ / संस्थांकडून सीए / आयसीडब्ल्यूए / सीएफए / एफआरएमसारखे व्यावसायिक कोर्स केलेला असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेत अधिकारी म्हणून ३ वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
सर्वसाधारण श्रेणीसाठी शुल्क ११८० रुपये, तर अनुसूचित जाती / जमाती उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ११८ रुपये बँक ऑफ महाराष्ट्रच्या जनरलिस्ट ऑफिसर पदाच्या अर्जासाठी आकारण्यात येणार आहे. महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी (PwBD) अर्ज प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे या पदासाठी निवड केली जाणार आहे.