अमृता फडणवीसनंतर भाई जगताप यांच्यावर निलेश राणेंची एकेरी टीका


मुंबई : सध्या राज्यात काँग्रेस नेते भाई जगताप हे चर्चेचा विषय बनले आहेत. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल केलेली टीका आणि त्यानंतर अमृता यांनी दिलेल्या सडेतोड उत्तरावरुन आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, या प्रकरणात आता भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनीदेखील उडी घेतली आहे. त्यांनी भाई जगताप विषयी एक ट्विट करून निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी भाई जगताप हे टपोरी असल्याची सडकून टीका केली आहे.


भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण डरपोक असल्यामुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक’ बदलून ‘भाई’ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकते, असे निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वी अमृता फडणवीस यांनी देखील भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख करत जगताप यांच्यावर निशाणा साधला होता.