अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी ‘वर्षा’वरील कार्यक्रमाला उपस्थित असणारा अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्ताला आमिर खानच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. आमिर खानचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमधून स्पष्ट झाले असून, तो सध्या क्वारंटाईमध्ये असल्याचे प्रवक्त्याने म्हटले आहे.

कोरोनाचा मातोश्रीत शिरकाव झाल्याचे समोर आल्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यासोबत हजेरी लावणाऱ्या अभिनेता आमिर खानलाही कोरोना झाला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.