सॅमसंगचा डबल फोल्डेबल स्मार्टफोन येतोय

इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रातील दिग्गज सॅमसंग कंपनी लवकरच डबल फोल्डेबल म्हणजे दोन वेळा दुमडता येणारा स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत आहे. स्मार्टफोन साठी नेहमीच लेटेस्ट आणि बेस्ट टेक्नोलॉजी देत असल्याचा दावा कंपनीकडून केला गेला आहे. सॅमसंगचा नवा लेटेस्ट डबल फोल्डेबल स्मार्टफोन याच वर्षात बाजारात दाखल होणार आहे. या फोनचे संकेतिक फोटो प्रसिद्ध झाले आहेत.

सॅमसंगने यापूर्वी फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केलेले आहेत. त्यापुढे जाऊन कंपनी, ग्राहक कल्पना करू शकणार नाहीत अश्या लेटेस्ट टेक्नोलॉजीचा परिचय करून देण्यासाठी सज्ज झाली आहे. नवा फोन सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड २ व झेड फ्लिपचा वारस असेल. निक्की एशियाच्या रिपोर्टनुसार सॅमसंगने नुकतेच ड्युअल फोल्डेबल स्मार्टफोनच्या अनेक मॉडेल्ससाठी पेटंट घेतले असून हे फोन या वर्षात लाँच केले जातील.

कंपनीने वर्षात १ कोटी फोल्डेबल स्मार्टफोन विक्रीचे लक्ष्य ठवले असून गतवर्षी ३५ लाख फोल्डेबल स्मार्टफोन विकले आहेत. गतवर्षी शाओमीने डबल फोल्डेबल स्मार्टफोनसाठी पेटंट घेतले आहे तर या वर्षी शाओमीसह ओप्पो, मोटोरोला समेत अन्य कंपन्यांनी फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.