जग्वार आयपेस इलेक्ट्रिक एसयुव्ही भारतात लाँच

जग्वारने त्यांची पहिली फुल इलेक्ट्रिक एसयुव्ही भारताच्या बाजारात सादर केली आहे. या आयपेस एसयूव्ही बेस एस ट्रीम सुरवातीची किंमत १ कोटी ५ लाख असून एसई ट्रीम १ कोटी ८ लाख पर्यंत मिळणार आहे. कंपनीने या एसयुव्ही साठी ८ वर्षे / १.६० लाख किमी बॅटरी वॉरंटी दिली आहे शिवाय ग्राहकांना पाच वर्षे सर्व्हिस पॅकेज, पाच वर्षे रोडसाईड असिस्टन्स व ७.४ के वॅट एसी वॉल बॉक्स चार्जर देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

जग्वारने २०२५ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक लाईनवर कन्व्हर्ट होणार असल्याची घोषणा पूर्वीच केली आहे. भारतीय बाजारात कंपनी तीन ट्रीम लाँच करत असून या एसयुव्ही ना पॉवर साठी दोन इलेक्ट्रिक मोटर्स दिल्या गेल्या आहेत. कारच्या फ्लोरसाईडला बॅटरी असून या सर्व कार्स ऑल व्हील ड्राईव्ह आहेत. मॅट्रीक्स एलईडी हेडलँप, एलईडी टेल लाईटवर सिग्नेचर पॅटर्न, २३० एमएम ग्राउंड क्लिअरन्स, थ्रीडी सराऊंड कॅमेरा, अॅडाप्टीव्ह क्रुझर कंट्रोल, रोलबॅक प्रोटेक्शन अशी तिची अन्य फिचर्स आहेत.

ही एसयूव्ही ० ते १०० किमीचा वेग अवघ्या ४.८ सेकंदात घेते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३२० किमी. ही एसयूव्ही सिंगल फुल चार्ज मध्ये ४७० किमी अंतर जाते.