बांगलादेशाच्या पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या १४ दहशतवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा


ढाका – एक महत्वाचा निर्णय बांगलादेशमधील न्यायालयाने सुनावला असून न्यायालयाने पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या १४ दहशतावद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. २००० मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांची हत्या करण्याचा दहशतवाद्यांनी प्रयत्न केला होता. नऊ दोषींना मंगळवारी सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी हा निर्णय सुनावण्यात आला. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिले आहे.

कायद्याने जर अडवणूक केली नाही, तर फायरिंग पथकाकडून शिक्षेची अंमलबाजवणी केली जाणार असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले आहे. अन्यथा फासावर दोषींना लटकवले जाणार आहे. बांगलादेश कायद्यांतर्गत मृत्यूदंडांच्या शिक्षेचा आढावा घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालय विभागाच्या मान्यतेनुसार दोषींना फाशी देण्यात येईल, असे न्यायाधीशांनी सांगितले आहे.

हरकत-उल जिहाद बांगलादेश संघटनेचे सर्व दोषी हे ऑपरेटिव्ह आहेत. इतर पाच दोषी फरार असून गैरहजेरीत त्यांच्यावरही खटला चालविला गेला. कायद्यानुसार त्यांचा बचाव राज्य-नियुक्त वकीलांनी केला होता. त्यांच्या अटकेनंतर किंवा आत्मसमर्पणानंतर निकालाची अंमलबजावणी करण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे.

२१ जुलै २००० रोजी गोपालगंज येथे ७४ किलो स्फोटकं लपवून ठेवत शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न हरकत-उल जिहाद बांगलादेशच्या दहशतवाद्यांनी केला होता. या ठिकाणी शेख हसीना यांची प्रचारसभा पार पडणार होती. पण सुरक्षा अधिकाऱ्यांनी सभेआधीच स्फोटकांची माहिती मिळवली आणि मोठी दुर्घटना टळली.