अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण


मागील काही दिवसामध्ये एकापाठोपाठ अनेक कलाकाराना कोरोनाची लागण होत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या यादीत आता कार्तिक आर्यनच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. याबाबतची माहिती कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत दिली.

कार्तिकने प्लसचे चिन्ह असलेला फोटो शेअर करत लिहीले आहे की, मी पॉझिटिव्ह झालो, माझ्यासाठी प्रार्थना करा. त्याच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी लगेच प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. कार्तिक हा दोन दिवसापुर्वी अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत एका फॅशन शोमध्ये सहभागी झाला होता. कार्तिकने या शोमध्ये मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला सूट घातला होता. कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने कार्तिकच्या चित्रपटांचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

सध्या भुलभुलैया २, दोस्ताना २ हे दोन मोठे चित्रपट कार्तिककडे आहेत. यात भुलभुलैयाच्या सेटवर त्याने तब्बू आणि कियारासोबत काम करतानाचे फोटो शेअर केले होते. तर दोस्ताना २ मध्ये जान्हवी कपूर ही कार्तिकची सहअभिनेत्री आहे. तर त्याचा ‘धमाका’ हा आगामी चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.