मिथुनदा बंगाल निवडणुक रिंगणात  उतरणार?

बॉलीवूड अभिनेता आणि आता राजकीय नेता अशी ओळख असलेला मिथुन चक्रवर्ती याने त्याचे नाव कोलकाता मतदार यादीत नोंदविले आहे. नुकताच मिथुनने भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मिथुन बंगाल विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार या चर्चेला उधाण आले आहे. अर्थात मिथुनने याबाबत काहीच स्पष्ट केलेले नाही तसेच बंगाल मधील भाजप वरिष्ठ नेते मिथुनच्या उमेदवारी बद्दलचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील असे सांगत आहेत.

मिथुन यांच्या नातेवाईक शर्मिष्ठा सरकार यांनी मिथुनदाचा कोलकात्यात २२/१८० राजा माजिंद्र रोड हा अधिकृत पत्ता असल्याचे आणि याच पत्यावर त्यांनी मतदार यादीत नाव नोंदविले असल्याचे मान्य केले आहे. मिथुन या पूर्वी तृणमुल कॉंग्रेसचा राज्यसभा सदस्य होता. आत्तापर्यंत मिथुनचे महाराष्ट्रात मतदार यादीत नाव होते. ७ मार्च रोजी कोलकाता येथील परेड ग्राउंडवर मोदी यांच्या झालेल्या रॅलीमध्ये मिथुनने भाजप प्रवेश केला आहे.