पुण्यात काल दिवसभरात २ हजार ९०० कोरोनाबाधितांची नोंद, तर २० जणांचा मृत्यू


पुणे – काल दिवसभरात पुणे शहरात २ हजार ९०० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. काल अखेर शहरातील एकूण बाधितांची संख्या २ लाख ३५ हजार ३९४ झाली आहे. आजपर्यंत ५ हजार ५३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान १ हजार २४५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर कालअखेर २ लाख ७ हजार ८१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

काल दिवसभरात पिंपरी-चिंचवड शहरात १ हजार ४१६ तर महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरील ११ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय ७९२ रूग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. दिवसभरात उपचारादरम्यान दहा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. १ लाख २२ हजार ३६५ वर पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या पोहचली आहे. यापैकी १ लाख ९ हजार ५५८ जण कोरोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ८०१ असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.