मुंबईत विनामास्क फिरणाऱ्य़ा 20 लाख लोकांकडून 40 कोटींचा दंड वसूल


मुंबई – महाराष्ट्रावर ओढावलेले कोरोनाचे संकट पुन्हा एकदा अजूनच गडद होत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. सरकारने कोरोना संसर्गाची प्रकरणे कशी कमी करता येतील यासाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली असून लोकांकडून त्याचे पालन व्हावे, यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. प्रशासनाचा प्रयत्न असा आहे की सोशल डिस्टन्सिंग पाळत कमीत कमी लोक घराबाहेर पडावेत. घराबाहेर जे पडत आहेत त्यांनी मास्क घालणे गरजेचे आहे. पण काही जण मास्क न लावताच घराबाहेर पडत आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

मास्क न घालता बाहेर पडलेल्या सुमारे 20 लाख लोकांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या लोकांकडून सुमारे 40 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखायचा याचा शोध घेण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. अशात नागरिकांनीही कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.