भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला नेपाळची परवानगी

भारतात कोविड १९ साठी हैद्राबादच्या भारत बायोटेकने तयार केलेल्या पहिल्या स्वदेशी कोवॅक्सिनचा वापर आता नेपाळ मध्ये केला जाणार आहे. शुक्रवारी नेपाळच्या राष्ट्रीय औषध नियामक प्राधिकरणाने या लसीच्या आपातकालीन वापरासाठी सशर्त परवानगी दिली आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला परवानगी देणारा नेपाळ जगातील तिसरा देश ठरला आहे. यापूर्वी भारत आणि झिंबाब्वे या देशांनी कोवॅक्सिन लसीच्या वापरास मंजुरी दिली आहे.

नेपाळला भारताकडून १० लाख कोवॅक्सिनचे डोस भेट म्हणून दिले जात आहेत. या शिवाय कोवीशिल्डचे २० लाख डोस नेपाळला मिळणार आहेत. कोवॅक्सिनच्या तिसऱ्या फेजच्या ट्रायल न घेताच या लसीच्या वापरास परवानगी दिली म्हणून देशातील विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला धारेवर धरले होते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच लसीचा पाहिला डोस घेऊन विरोधकांच्या आरोपाचा जबाब दिला होता.