या देशातील पुरुष घेऊ शकतो कोणत्याही तरुणीची ‘पप्पी’, पण का…

kiss
अल्मेनिक कार्निव्हल हा सध्याच्या घडीला पुर्व दक्षिण-पश्चिम जर्मनीमध्ये सुरु असून दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या गुरूवारी हा कार्निव्हल सुरू होऊन तो मार्चच्या पहिल्या बुधवारी संपतो. या कार्निव्हलचे काही फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. तसे पाहायला गेले तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जर्मनीमध्ये उत्सव आणि पार्टीचे वातावरण सुरू होते. पण तेथे सध्या परेडसोबतच अल्मेनिक कार्निव्हल साजरा केला जात आहे. सोमवार या परेडचा सर्वाच खास दिवस असतो. रोड मंडे, हायलाइट नावाने सोमवारच्या परेडला ओळखले जाते. मुंडेरकिंगमध्ये कार्निव्हल परेडला या कार्निव्हलदरम्यान ट्रेडीशनल रूपाने तरूण मंडळी मुख्य चौकातून फाऊंटनपर्यंत घेऊन जाता. त्यानंतर आजूबाजूला असलेल्या कोणत्याही मुलीची त्यांना पप्पी घेण्याची संधी मिळते. सहभागी व्यक्तीला मुलीची पप्पी घेण्याआधी फाऊंटनमध्ये उडी घ्यावी लागते.
kiss1
जर्मनीतील रोजेनमोंटाकच्या जवळपास खासकरून हो कार्निव्हल साजरा केला जातो. फिफ्थ सीजन असेही याला म्हटले जाते. संपूर्ण जर्मनीमध्ये हे कार्निव्हल वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. गुरूवारी सुरू होणाऱ्या या कार्निव्हलला पश्चिम जर्मनीमध्ये ‘महिला दिवस’ म्हणूनही ओळखले जाते. तेथील पौराणिक कथांनुसार, १८२४ मध्ये धोबी महिलांकडून करण्यात आलेल्या एका विद्रोहाच्या आठवणीत महिला शहरातील हॉलमध्ये शिरतात. तसेच तेथील पुरूषांचे टाय कापतात आणि तसेच त्यांना त्यांच्या मार्गाने जात असलेल्या कोणत्याही माणसाची पप्पी घेण्याची परवानगी असते. ‘स्वाबियन-अल्मेनिक’ कार्निव्हलच्या नावाने दक्षिण-पश्चिम जर्मनीमध्ये याला ओळखले जाते.

Leave a Comment