या सर्वांगसुंदर निसर्गरम्य खेड्यात बनतात तालवाद्ये

peruvambe
केरळ या राज्याला गॉडस ओन कंट्री असे सार्थ नाव आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या राज्यात अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत. हिरव्यागार भातशेतीला लपेटून बसलेली छोटी छोटी खेडी डोळ्यांना गारवा आणि मनाला शांतता देतात. यातील एक गाव आहे पेरुवेम्बा. एका सरळ रस्त्याने दोन भागात विभागले गेलेले हे गाव मनाला वेगळ्या प्रकारे शांती देते. म्हणजे सहज रस्त्यातून चालत असताना अचानक एखादा तबला, मृदुंग, पखवाज घुमतो आणि क्षणात मनाला एक वेगळाच ताल वेढुन टाकतो.

होय केरळच्या या छोट्या गावात तालवाद्ये बनविण्याची परंपरा गेली २०० वर्षे आहे. तबले, मृदंगम, चंडा, माद्द्लम अशी अनेक चामडी वाद्ये येथे घडविली जातात. हे काम करणारी पाच कुटुंबे येथे आहेत. अनेक वादक येथे वाद्य खरेदीसाठी तसेच वाद्य दुरुस्तीसाठी आवर्जुन येतात. अर्थात या भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने आणि चामड्याचा कामासाठी पाउस अडथळा ठरत असल्याने येथे बहुतेक सर्व काम उन्हाळ्यात केले जाते.

mrudung
वाद्ये घडविण्याचे बहुतेक काम हाताने केले जाते. लाकडावर चामडे बसविणे, वाद्या बांधणे, धागे तयार करणे, विशिष्ट प्रकारे स्वर संतुलन साधणे अश्या प्रकारचे हे कौशल्याचे काम असते. एकीकडे हातोडीचे घाव तर दुसरीकडे नाजूक नजाकतीने स्वर संतुलन करावे लागते. म्हणजे कठोर आणि कोमल यांचे मिश्रण असलेले हे काम आहे.

येथे भागावतार नावाचे एक विशेष प्रकारचे संगीत प्रसिद्ध असून ते एक प्रकारचे कर्नाटकी संगीत आहे. ८० वर्षाचे केपीके कुट्टी नावाचे गुरु गावाच्या २५ किमी परिसरातील मुलांना हे संगीत शिक्षण देतात. सुमारे ३५० मुले हे शिक्षण घेत आहेत. मंदिरातून हे गानशिक्षण दिले जाते. त्यासाठी प्रथम मंदिरात पूजा पाठ करून सरगमची सुरवात केली जाते.

Leave a Comment