काय आहे परमवीर चक्र सन्मान?

paramveer
पाकिस्तानी लढाऊ विमान पाडून आणि पाकिस्तानच्या ताब्यात ६० तास राहून मायदेशी सुखरूप परतलेले विंग कमांडर अभिनंदन यांना त्यांनी दाखविलेल्या साहस आणि शौर्याबद्दल परमवीर चक्र सन्मान दिला जावा अशी मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री इ पलानीस्वामी यांनी केली आहे आणि तसे पत्र मोदींना पाठविले आहे.

परमवीर चक्र या सन्मान नक्की काय आहे याची अनेकांना माहिती नसेल. हा सेनेचा सर्वोच्च सन्मान असून प्रतिकूल परिस्थितीत अतुलनीय शौर्य आणि साहस दाखविणाऱ्या सैनिकांना तो दिला जातो. भारतरत्न नंतरचा हा दुसरा सर्वोच्च सन्मानित पुरस्कार असून तो फक्त लष्करासाठी आहे.

हा पुरस्कार देण्याची सुरवात २६ जानेवारी १९५० पासून झाली. स्वातंत्र्यापूर्वी भारतीय सेना ब्रिटीश सेनेच्या अधिपत्याखाली होती तेव्हा अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस देऊन सन्मानित केले जात असे. त्यानंतर शत्रूच्या उपस्थितीत उच्च कोटीचे धैर्य, शौर्य आणि पराक्रम गाजविणाऱ्या सैनिकांना हा पुरस्कार देण्यात येऊ लागला. आजपर्यंत बहुतेकांना तो मरणोत्तर मिळाला आहे. ६ जुलाई १९९९ ला शेवटचे परमवीर चक्र दिले गेले आहे. हा पुरस्कार सेनेचा कोणताही अधिकारी, कर्मचारी मिळवू शकतो. लेफ्टनंट किंवा त्यापेक्षा कमी पदावरील कर्मचाऱ्याला तो जाहीर झाला तर त्याला आणि परिवाराला पेन्शन तसेच रोख पारितोषिक द्यावे असा नियम आहे.

Leave a Comment