हॉटेलमध्ये जेवणानंतर लिंबूफोडीसह का दिला जातो फिंगर बाउल


आपण कोणत्याची जरा बऱ्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये गेलो कि जेवणानंतर कोमट पाण्यात लिंबाची फोड घातलेला फिंगर बाउल दिला जातो हे पाहतो. जेवलेले हात स्वच्छ करणे हा त्याचा उद्देश आहेच पण त्याशिवाय आणखी काही कारणे त्यामागे आहेत.

असे बाउल देण्याची परंपरा खूप जुनी आहे. त्याकाळी जेवणानंतर स्वीटडिश खाल्ली कि त्या मिठाईचे डाग अंगावरच्या कपड्यांना पडू नयेत म्हणून असे बाउल दिले जात. आजकाल मात्र सर्रास असे बाउल दिले जातात. लिंबू फोड देण्यामागे त्यातील अॅसिडमुळे हाताचा तेलकटपण जावा तसेच हाताचा वास जावा हा उदेश असतो. शिवाय लिंबू जंतूंचा नाश करते.

या संदर्भात काही एटीकेट्स आहेत ते अनेकदा माहिती नसतात. असा बाऊल दिल्यावर त्यातील लिंबाची फोड बाजूला करायची असते मात्र अनेकजण लिंबू हाताने कुस्कारतात. बाउल मध्ये फक्त बोटे बुडविणे अपेक्षित आहे. मात्र अनेक जण संपूर्ण हात धुतात. फार पूर्वी एलिट वर्गातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल मालक असे बाउल आणि लाइव म्युझिक याचा वापर करत असत. आता मात्र तो रिवाज पडला आहे.

भारतात फिंगरबाउल देण्याची पद्धत अधिकच रुळत चालली असली तरी युएस मध्ये पहिल्या जागतिक युद्धानंतर हि प्रथा बंद केली गेली आहे. भारतातही वास्तविक भांड्यात हात धुणे निषिद्ध मानले गेले आहे. पण तरीही ही प्रथा पाळली जात आहे.

Leave a Comment