गोड मधुर जिलेबी विषयी बरेच कांही


जिलेबी हे एकेकाळचे लग्नसमारंभात आवर्जून केले जाणारे आंबटगोड चवीचे पक्वान आता कधीही उपलब्ध आहे व अनेक लोक अत्यंत आवडीने कधीही, कुठेही ते चापत असतात. आपल्याला जिलेबी भारतीय वाटत असली तरी जगभरात अनेक देशांत ती आवडीने खाल्ली जाते. कांही जणांना जिलेबी म्हणजे जीव की प्राणही असते. रबडी जिलेबी हे काँबिनेशन कांही जणांसाठी अमृताहूनही थोर आहे. जिलेबी खाण्यातला आनंद अन्य पक्वांन्ने अथवा मिठाईत नाही असा समज असणारे महाभागही अनेक आहेत.

जिलेबी भारतात मोठ्या प्रमाणावर खाल्ली जात असली तरी ती मूळची भारतीय नाही. ५०० वर्षांपूर्वी ती भारतात आली. संस्कृतमध्ये तिला नवसुधा कुंडलिका असे नाव आहे तसच जलवल्लीका म्हणूनही ती ओळखली जाते. १३ व्या शतकात तुर्की मोहम्मद बिन हसन याच्या पुस्तकात जलाबिया नावाने जिलेबीचा उल्लेख येतो. जैन ग्रंथ कर्णप यांतही जिलेबी म्हणजे भगवानाला भोग लावण्याची मिठाई असा उल्लेख सापडतो.


अफ्रिकी देशात जिलेबीशी मिळतीजुळती मिठाई बनविली जाते. जिलेबी प्रामुख्याने मैद्यापासून बनविली जात असली तरी उडीद व तांदूळ यांच्यापासूनही जिलेबी बनविली जाते.अफगाणिस्तानात मासे आणि जिलेबी हे काँबिनेशन अतिशय लोकप्रिय आहे. मुंबईत १८ किलो वजनाची जिलेबी बनवून जागतिक रेकार्ड नोंदविले गेले होते. भारत, पाकिस्तान, बांग्लादेशासह सर्व अरब देशात ती खाल्ली जाते. असे सांगतात ज्यांना पनीर आवडते त्यांना जिलेबी आवडतेच. इंग्रजीत मात्र जिलेबीला स्वीट मीट असे नांव आहे.

Leave a Comment