असे चालते गुप्तहेर संघटना मोसादचे काम

mossad11
जगभरात अनेक गुप्तहेर संघटना कार्यरत आहेत. भारताची रॉ, अमेरिकेची सीआयअ, रशियाची केजीबी, चीनची मिनिस्ट्री ऑफ स्टेट अँड सिक्युरिटी अशी अनेक नावे आपल्या ऐकण्यात आहेत. मात्र या सर्वात प्रबळ आणि अतिशय घातक गुप्तहेर संस्था आहे ती इस्रायलची मोसाद.

ही इस्रायल सरकारची अधिकृत गुप्तहेर संघटना नाही मात्र तरीही सरकारशी सलग्न आहे. बचाव कार्यापासून ते दहशतवाद मुकाबला, गुप्त माहिती मिळविणे हे तिचे काम असल्याचे सांगितले जात असले तरी या यंत्रणेच्या खऱ्या कामाची माहिती कधीच बाहेर आलेली नाही. मोसादची रचना, त्यांची ध्येये आणि शक्ती देशाच्या कायद्याच्या अधिपत्याखाली येत नाही. मात्र या यंत्रणेला बजावलेल्या कामगिरीसाठी पंतप्रधानांना उत्तर द्यावे लागेते.

mosad
या यंत्रणेचे दोन भाग आहेत. पैकी एक किटोन. दहशद्वाद्यांशी मुकाबला हे त्यांचे काम आहे असे सांगतात. दुसरा भाग आहे मेटसाद. यांचे काम शत्रूवर हल्ला, हत्या घडवून आणणे, मारहाण, आतंकी कट उधळून लावणे अशी त्यांची जबाबदारी आहे. कीटोनचे खरे काम कधीच जगासमोर आलेले नाही. त्यांनी अनेक अवघड कामगिऱ्या यशस्वी केल्या असून त्यातील गाजलेले ऑपरेशन म्हणजे रेथ ऑफ गॉड. याचा अर्थ देवाचा प्रकोप.

mossad1
जर्मनीत १९७२ मध्ये झालेल्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये पॅलेस्तिनी दहशद्वाद्यानी इस्रायलच्या ११ ऑलिम्पिक खेळाडूना बंधक बनवून त्यांची हत्या केली होती. मोसादने यात जे कोणी सामील होते त्या सर्वांची यादी बनविली गेली आणि त्या सर्वाना शोधून काढून त्यांना यमसदनी पाठविले गेले. यात राजकीय नेते होते, उद्योगपती होते, दहशतवादी होते. हा शोध सतत २० वर्षे घेतला गेला मात्र एकेकाला वेचून मोसादने ठार केले. या प्रकरणी अनेक हेर घरादारापासून कित्येक वर्षे दूर राहिले. सरकारने त्यांना ते ओळखले गेले तर सरकार ओळख देणार नाही असे बजावले होते.

mossad12
ही कामगिरी पार पडताना मोसाद एजंटनि अनेकदा देशाच्या सुरक्षा प्रोटोकॉलचा भंग केला पण त्यांचे काम त्यांनी फत्ते केले. मोसाद मध्ये महिला गुप्तहेरांची संख्याही लक्षणीय असल्याचे समजते. जर्मनीचा प्रभाव झाल्यावर ज्यूचे शिरकाण करणारया अनेक नाझी नेत्यांना ओळख लपवून परदेशात गेलेल्या आणि तेथेच राहिलेल्यना अनेक वर्षे शोध घेऊन, शोधून काढून त्यांना ठार करण्याची कामगिरी मोसादने पार पडली आहे.

Leave a Comment