अडीच हजार वस्तीच्या गावाने देशाला दिलेत २८० सैनिक

army
भारतीय सेनेत सध्या जवानांची कमतरता असल्याचे आपण जाणतो. मात्र देशसेवेचा अनोखा वारसा गेल्या तीन पिढ्यांपासून जपणारे अवघे अडीच हजार वस्तीचे छोटेसे गाव म्हणूनच वेगळे आहे. कोल्हापूर जिल्यातील गिरगाव या छोट्याश्या खेड्याने १८५७ च्या स्वतंत्र लढ्यापासून आत्तापर्यंत २८० सैनिक देशाला दिले आहेत. आणि आजही या छोट्या गावातील प्रत्येक घराचा या ना त्या स्वरुपात भारतीय लष्कराशी संबंध आहे.

sainik
१८५७च्या ब्रिटीश विरोधी बंडात या गावातील फिरंगोजी शिंदे यांनी प्राणाची बाजी लावली आणि देशासाठी प्राणार्पण केले. त्याचा पुतळा आजही या गावात आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन पहिल्या जागतिक महायुद्धपासून ते आजपर्यंत प्रत्येक घराने देशसेवेसाठी योगदान दिले आहे. १९७१ च्या पाक विरोधी युद्धात या गावातील पाटील कुटुंबातील चार भाऊ एकाचवेळी देशासाठी लढले आहेत आणि आज त्यांची मुलेही सेनेत भरती आहेत.

आज घडीला या गावात १६५ निवृत्त जवान असून सध्या ६५ जवान देशसेवेत कार्यरत आहेत. गावातील निवृत्त जवान तरुणांना लष्कर भरतीसाठी प्रशिक्षण देतात. गावातील मुले दररोज सैनिकी प्रशिक्षणाचा सर्व करतात. विशेष म्हणजे २००९-१० च्या दहावी बॅच मधली १३ मुले एकाचवेळी सैन्यात दाखल झाली आहेत.

Leave a Comment