13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी इंस्टाग्रामचे नवे अ‍ॅप


नवी दिल्ली : लहान मुलांसाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम नवीन अ‍ॅप लाँच करणार असून हे अ‍ॅप सध्याच्या इन्स्टाग्रामचे एक नवीन व्हर्जन असेल. हे अ‍ॅप विशेषत: 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी असणार आहे. BuzzFeed ला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची माहिती इन्स्टाग्राम प्रॉडक्टचे उपाध्यक्ष विशाल शाह यांनी दिली आहे. शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामचे दोन व्हर्जन असतील. एक व्हर्जन 13 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी असेल. तर दुसरे व्हर्जन 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी असेल. या सेफ मोडमध्ये लहान मुले इन्स्टाग्रामचा वापर करू शकणार आहेत.

13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सध्याचे इन्स्टाग्रामची पॉलिसी वापरण्याची परवानगी देत नाही. तसेच, मुले त्यांचे पालक आणि व्यवस्थापकांच्या देखरेखीखाली इन्स्टाग्राम वापरू शकतात. BuzzFeed ने दिलेल्या रिपोर्टनुसार, किड्स फोक्स्ड इंस्टाग्राम व्हर्जनचे काम इंस्टाग्रामचे प्रमुख Adam Mosseri पाहतील. त्याचे नेतृत्व फेसबुकचे उपाध्यक्ष पवनी दिवानजी करणार आहेत, यापूर्वी त्यांनीच युट्यूब किड्सचे नेतृत्व केले होते. हे गुगलच्या सब्सिडियरीचे चाइल्ड फोकस्ड प्रोडक्ट आहे.

मुलांवर वाढत्या गुन्ह्यांच्या तक्रारी फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर येऊ लागल्या आहेत. या प्लॅटफॉर्मवर मुलांशी संबंधित आक्षेपार्ह पोस्ट असल्याचा आरोप आहे. यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेंट काढून टाकण्यासाठी दबाव वाढला होता. यूके आधारित नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रूएल्टी टू चिल्ड्रनच्या रिपोर्टनुसार, मुलांशी संबंधित सर्वाधिक केसेस इन्स्टाग्रामवर आढळल्या आहेत. यात गेल्या तीन वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी स्वतंत्र अ‍ॅप्स तयार करण्याचा दबाव वाढला आहे.