इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा


नवी दिल्ली – भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंची या मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे. संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे असून एकदिवसीय संघात मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली आहे. ही मालिका 23 मार्चपासून खेळवली जाईल.

इंग्लंडविरोधातील चौथ्या टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यानंतर सूर्यकुमारने अर्धशतक साजरे करत सर्वांना आपली नोंद घेण्यास भाग पाडले. पण या संघातून विजय हजारे स्पर्धेत धावांची बरसात करणाऱ्या पृथ्वी शॉला वगळण्यात आले आहे. तर, आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेला गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक –

  • 23 मार्च – पहिला सामना
  • 26 मार्च – दुसरा सामना
  • 28 मार्च – तिसरा सामना (सर्व सामने पुण्यात खेळवले जाणार)