पहिलवान बजरंग पुनियाने घेतला करोना लसीचा खुराक

टोक्यो ऑलिम्पिक साठी कसून सराव करत असलेल्या भारताच्या स्टार रेसलर बजरंग पुनिया याने सोनीपत येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात भरलेल्या राष्ट्रीय शिबिरात गुरुवारी कोविड लसीचा पाहिला डोस घेतला.

बजरंग ६५ किलो वजनी गटात रोम मध्ये मॅटीयो पेलीकोन स्पर्धेत भाग घेऊन परतला आहे. त्याच्या बचाव पद्धतीत खुपच सुधारणा झाल्याचे दिसत आहे. करोना लस घेण्याबद्दल बोलताना बजरंग म्हणाला, लसीकरणासाठी जे नियम आहेत त्याचे पालन करून मी लस घेतली. लस घेण्यापूर्वी नियमाप्रमाणे नोंदणी केली होती. लस घेतल्यावर थोडा डोकेदुखी आणि जडपणाचा त्रास झाला पण आता माझी तब्येत पूर्ववत आहे.