सॅमसंग गॅलेक्सी ए५२, ए ५२ फाईव्हजी आणि ए ७२ स्मार्टफोन लाँच

सॅमसंगने त्यांच्या गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंट मध्ये बुधवारी ए ५२, ए ५२ फाईव्ह जी आणि ए ७२ हे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. हे सर्व फोन वॉटर, डस्ट प्रूफ असून त्यांना क्वाड कॅमेरा सेटअप आणि पंचहोल डिस्प्ले दिला गेला आहे. या सर्व फोन साठी इलेक्ट्रॉनिक खास फिचर्स दिली गेली आहेत. त्यात डॉल्बी एटमॅस सपोर्टसह स्टीरीओ स्पीकर्स, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर यांचा समावेश असून कंपनीने या फोन साठी ३ जनरेशन पर्यंत ओएस अपग्रेड व मिनिमम ४ वर्षे रेग्युलर सिक्युरिटी अपग्रेड दिला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

ए ५२ आणि ए ५२ फाईव्ह जी तसेच ए ७२ साठी ड्युअल नॅनो सीम सपोर्ट, अँड्राईड ११ ओएस आहे. या फोनच्या किमती अनुक्रमे ३४९ युरो म्हणजे ३०२०० रुपये, ४२९ युरो-३७१०० रुपये आणि ४४९ युरो म्हणजे ३८८८० रुपये आहेत. चार कलर ऑप्शन मध्ये हे फोन उपलब्ध आहेत. ए ५२ आणि ए ५२ फाईव्ह जी साठी ६.५ इंची फुल एचडी डिस्प्ले आहे तर ए ७२ साठी ७.२ इंची डिस्प्ले आहे. तिन्ही फोन साठी ८ जीबी रॅम आहे. क्वाड कॅमेऱ्यातील प्रायमरी कॅमेरा ६४ एमपीचा आहे तर सेल्फी साठी ३२ एमपी कॅमेरा दिला गेला आहे.

ए ५२ साठी १२८ जीबी मेमरी आहे तर बाकी दोन फोन साठी १२८ व २५६ जीबी मेमरी आहे. या सर्व फोन मध्ये मायक्रोकार्डच्या सहाय्याने मेमरी १ टीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. हे फोन भारतीय बाजारात कधी दाखल होणार याची कोणतीही माहिती दिली गेलेली नाही.