फक्त एका सेकंदात घडत असते खूप काही

एक सेकंद म्हणजे डोळ्याची पापणी लवेल इतका छोटा काळ. या इतक्या छोट्या काळात जगात मात्र प्रचंड उलथापालथ होत असते म्हणजे असंख्य गोष्टी घडत असतात.  आपल्याला अनेकदा त्याबद्दल काहीच माहिती नसते. अर्थात या घटना सुद्धा मनोरंजक आणि आपल्या ज्ञानात भर टाकणाऱ्या आहेत.

आपल्या जीवनाचा रोजचा भाग बनलेल्या फेसबुक, ट्विटरचा विचार केला तर असे दिसते की फेसबुकवर दर सेकंदाला पाच नवे अकौंट उघडले जातात, आणि एका सेकंदाला २० हजार युजर्स फेसबुकवर अॅक्टीव्ह असतात. इतक्याच वेळात ५१० कॉमेंट पोस्ट केल्या जातात, २९३,००० नवीन स्टेट्स टाकले जातात आणि १३६००० फोटो अपलोड केले जातात. ट्विटरवर हीच संख्या ६ ते ७ हजार आहे. गुगलवर एका सेकंदात ५४ हजार सर्च केले जातात. १९९८ मध्ये जेव्हा गुगल सुरु झाले तेव्हा दिवसाला १० हजार सर्च केले जात असत.

एका सेकंदाच्या काळात इन्स्टाग्रामवर ७२८ फोटो उपलोड केले जातात, युट्यूबवर १२५४०६ व्हीडीओ पाहिले जातात, स्काईप वरून २१७७ कॉल केले जातात.

एका सेकंदाच्या काळात जगात सहा बालके जन्माला येतात. आपण लाळ गिळतो तो वेग सुद्धा प्रती सेकंड १०० मीटर लांबीची लाळ इतका आहे. बंदुकीची गोळी प्रती सेकंड ९०० मीटर वेगाने जाते तर एका सेकंदात सहा वेळा वीज चमकते. एका सेकंदाला जगात ९८ किलो अन्न फेकले जाते. एका रिपोर्ट नुसार ९२ टक्के अमेरिकन ४० टक्के अन्न सेकंदाला फेकून देत असतात.

मधमाशी सेकंदाला २७० वेळा पंख फडफडविते. सेकंदाला ३ बार्बी डॉल विकल्या जातात आणि एका सेकंदात जगभरात १०४५० कोका कोलाच्या बाटल्या फस्त केल्या जातात. १ सेकंदात कोका कोलाच्या २० हजार बाटल्या विकल्या जातात.

सौंदर्य प्रसाधनांच्या विषयी बोलायचे तर एका सेकंदात वेगवेगळया रंग आणि क्वालिटीच्या ६० लिपस्टिक बनविल्या जातात. आता बोला!