कावासाकी निन्जा झेडएक्स-१० आर भारतात दाखल
कावासाकी इंडियाने त्यांची जबरदस्त कावासाकी निन्जा झेडएक्स-१० आर भारतीय बाजारात लाँच केली आहे. या बाईकची एक्स शो रूम किंमत १४.९९ लाख रुपये आहे. लाईम ग्रीन आणि फ्लॅट एबनी टाईप दोन अश्या दोन रंगात ही बाईक मिळू शकणार आहे. अगोदरच्या निन्जा बाईक पेक्षा या बाईकच्या डिझाईन आणि फिचर्स मध्ये अनेक बदल केले गेले आहेत. ही बाईक ० ते १०० किमीचा वेग अवध्या ३ सेकंदात घेते आणि तिचा सर्वाधिक वेग आहे ताशी २९९ किमी. ही बाईक एका लिटरला १६.२ किमी मायलेज देते.
२०२१ निन्जा झेडएक्स-१० आरचे स्टायलिंग शार्प आहे. एरोडायनामिक फ्रंट काऊल अपडेटेड टेल सेक्शन, ऑल एलईडी लाईट्स, अपडेटेड हँडल बार आहे. बाईक बीएस ६ नॉर्म नुसार असून तिला ९९८ सीसीचे लिक्विड कूल इनलाईन फोर इंजिन दिले गेले आहे. सिक्स स्पीड गिअरबॉक्स आहे.
नवीन मॉडेल मध्ये ब्ल्यू टूथ इनबिल्ट ४.३ इंची डिजिटल टीएफटी कलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे त्यामुळे रेडिओलॉजी अॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनला जोडता येते. बाईकला अनेक इलेक्ट्रोनिक सुविधा आहेत. इलेक्ट्रॉनिक क्रूड कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, लाँच कंट्रोल, कॉर्नरिंग मॅनेजमेंट सिस्टीम, पॉवर मोडस, इंजिन ब्रेक कंट्रोल आणि एबीएस दिले गेले आहे. स्पोर्ट, रेन, रायडर आणि रोड असे चार ड्रायविंग ऑप्शन आहेत.