देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची बूकिंग फक्त १० हजारांत सुरु


इलेक्ट्रिक वाहनांची देशाच्या ऑटो सेगमेंटमध्ये मागणी सतत वाढत आहे. त्यामागील पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमती हे एक कारण असल्यामुळे त्यामुळे सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर बहुतांश मोठ्या कार कंपन्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. कार देशाच्या ऑटो मार्केटमध्ये सतत नवनवीन इलेक्ट्रिक येत आहेत. अशातच मुंबईच्या एका स्टार्टअप कंपनीने आता आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवली असून कंपनीने ही कार भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचा दावाही केला आहे.

स्ट्रोम Motors ने ही नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केली असून या कारचे स्ट्रोम R3 असे नाव आहे. भारतात या कारसाठी कंपनीने बूकिंगलाही सुरूवात केली आहे. पुढील काही आठवडे या कारसाठी बूकिंग सुरू असणार आहे. सुरूवातीला ग्राहकांना 50,000 रुपयांच्या अपग्रेड्सचा फायदा मिळेल. यात कस्टमाइज्ड कलर ऑप्शन, प्रीमियम ऑडिओ सिस्टिम आणि तीन वर्षांपर्यंत फ्री मेन्टेनन्सचा समावेश आहे.

या कारसाठी १० हजार रुपयांमध्ये प्री-बूकिंगला सुरूवात झाली आहे. कंपनीने केवळ मुंबई आणि एनसीआरमध्ये सध्या प्री-बूकिंग घेण्यास सुरूवात केली आहे, पण लवकरच अन्य शहरांमध्येही सुरूवात होईल. स्ट्रोम R3 कारच्या लूकबाबत सांगायचे झाले तर या इलेक्ट्रिक कारमध्ये तीन चाके आहेत, पण ही कार दिसायला थ्री-व्हीलर किंवा रिक्षाप्रमाणे दिसत नाही. या कारचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही कार थ्री व्हीलर आहे, पण रिक्षाप्रमाणे पुढे एक चाक आणि मागे दोन चाक अशी या कारची रचना नाही, तर याच्या अगदी उलट म्हणजे मागे फक्त एक चाक आणि पुढे दोन चाक अशी या कारची रचना आहे.

तुम्ही इलेक्ट्रिक कार Storm R3 ला बघून नक्कीच हैराण व्हाल, कारण दोन चाके पुढे आणि फक्त एक चाक मागे आहे. तीन चाकांची ही जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. स्ट्रोम R3 एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर जवळपास 200 किमीचा प्रवास करु शकते, असा दावाही कंपनीने केला आहे. यात 4G कनेक्टेड डायग्नोस्टिक इंजिन आहे, त्याद्वारे चालकाला ट्रॅक लोकेशन आणि चार्जिंग स्टेटसची माहिती मिळते. स्ट्रोम आर 3 एक लिथियम-आयन बॅटरी पॅक आणि एका इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालते. जी 20hp / 90Nm पॉवर आणि टॉर्क देते. या कारच्या बॅटरीवर 1 लाख किलोमीटर प्रवास किंवा 3 वर्षांपर्यंतची वॉरंटी दिली आहे. या कारची बॅटरी तीन तासांत 100 टक्के चार्ज होते, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ब्लॅक्ड आऊट बी पीलर्स, ORVMs, अलॉय व्हील्स स्ट्रोम R3 कारच्या साईडला देण्यात आले आहेत. कारच्या मागच्या बाजूला टेललाईट्स आहेत. ही इलेक्ट्रिक कार 2,907 mm लांब, 185 mm रुंद आणि 550 किलो वजनाची आहे. स्ट्रोम R3 मध्ये एक सनरूफ, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पॉवर विंडो, रिमोट कीलेस एंट्री, 12 वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि 3-स्पोक स्टीयरिंग व्हीलसह 2-सीटर केबिन आहे. स्ट्रोम R3 कारमध्ये 4.3 इंचांचं टचस्क्रीन डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, आयओटी-सक्षम कंटिन्यूअस मॉनिटरिंग सिस्टिमसह 7.0 इंचांचं वर्टिकल-पोस्ट टचस्क्रीन कन्सोल आणि सहायक 2.4 इंच टचस्क्रीन युनिट देण्यात आलं आहे.

ब्रेकिंग आणि तीन ड्रायव्हिंग मोड्ससह ही कार येते. यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे मोड्स देण्यात आले आहेत. या कारची बॅटरी अवघ्या तीन तासात पूर्णपणे चार्ज होऊ शकते. यंदा बूकिंग केल्यानंतर २०२२ पासून या टू-सीटर इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू होईल. अवघ्या चार दिवसांमध्येच या कारसाठी कंपनीला जवळपास 705 कोटी रुपयांच्या बूकिंग्स(165 युनिटसाठी) मिळाल्या आहेत. कंपनीने सध्या केवळ दिल्ली आणि मुंबईतच स्ट्रोम R3 साठी बूकिंग घेण्यास सुरूवात केली आहे. पण लवकरच अन्य शहरांमध्येही बूकिंगला सुरूवात होईल. 4.5 लाख रुपये एवढी कंपनीने स्ट्रोम R3 ची किंमत ठेवली आहे.